
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे रनांगणात उतरणार.!
दैनिक चालू वार्ता
उमरगा प्रतिनिधि
शिवराय पाटील
उमरगा:-उमरगा-लोहारा(राखीव अनुसूचित जाती)मतदारसंघातून विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून लढवणार असून उमेदवारीची मागणी केली आहे.अशी माहिती आमदार बच्चू कडू यांचे स्वीय सहायक सातलिंग स्वामी यांनी बुधवारी (दि.१२)रोजी उमरग्यात शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेत दिली.श्री स्वामी पुढे म्हणाले की,सामाजिक संघटनेच्या माध्यमातून उमरगा-लोहारा तालुक्यातील तळागाळातील जणतेशी संबंध ठेवला असून लोकांशी संपर्क वाढला आहे.वीरशैव लिंगायत समाज युवक संघटनेचे तुळजापूर तालुका संपर्क प्रमुख ते जिल्हा संघटनेवर काम केले आहे.सध्या या संघटनेचा राज्याचा चिटणीस म्हणून काम पाहतो आहे.पंचायत समितीत कनिष्ठ सहायक पदावर कार्यरत असताना उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे स्वीय सहायक,माजी मंत्री विनय कोरे,माजी मंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहायक म्हणून काम करताना ग्रामीण भागातील विविध प्रश्न,विकास कामांची पूर्तता या बाबींचा मोठा अनुभव आहे,या माध्यमातून लोकसंपर्क वाढ़ला.गेल्या दीड वर्षापासून उमरगा,लोहारा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संपर्क सुरु आहे.प्रलंबित असलेले तांडा वस्ती विकास कामांसाठीचा जवळपास पंधरा कोटींचा निधी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी जानेवारी २०२२ वर्षात तांडावस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करून घेतला असेही ते सांगितले.शिवा संघटना,प्रहार संघटना,प्रहार जनशक्ती पक्ष असो की विविध सामाजिक संघटनेशी आपली जवळीकता आहे.खा.ओमराजे निंबाळकर आ.कैलास पाटील यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे.युवा सेनेचे प्रमुख वरून सरदेसाई यांनी कामाला लागा असा शब्द दिला असून लवकरच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.निवडणुकीच्या अगोदर नोकरीचा राजीनामा पण देणार आहे.शिवाय जून २०२४ ला नोकरीचे वीस वर्ष पूर्ण होत असल्याने स्वेच्छानिवृत्तीचाही माझा अधिकार आहे,त्यामुळे कसल्याही परिस्थितीत आणि काही बदल झाला तरी निवडणूक लढवणार असल्याचे श्री. स्वामी यांनी सांगितले…