
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक १३ जुलै 2023 रोजी देगलूर येथील साठे चौकामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला .भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल देगलूर येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस निलेश राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आले त्यानंतर त्यांच्या प्रतिमेची धन करून आक्रोश व्यक्त करण्यात आले त्यावेळी देगलूर तालुक्याचे सर्व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते…