
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
श्री डी. एन. पवार चितळीकर निवृत मुख्याध्यापक जि. प. नांदेड यांनी मराठा सेवा संघातर्फे चालविण्यात येत असलेल्या मराठा वसाहतिगृहाला नवा मोंढा नांदेड येथे भेट दिली.
त्यानीं येथील सर्व व्यवस्था पहाऊन रुपये 11000 देणगी म्हणून मराठा मुलींचे वस्तीगृहास दिली. येथे मुलींची जेवणाची व राहण्याची व्यवस्था उत्कृष्ट आहे.
येथे मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्यात येते. येथे मुलीच्या वसाहती ग्रहाची भव्य इमारत असून सर्व मुली आनंदाने राहतात.
तसेच मराठा मुलीच्या वसाहतीगृहात शासनाची कुठलाही मदत नाही. देणगी दिल्याबद्दल मुख्य व्यवस्थापक श्री मधुकर मामा देशमुख यांनी डी. एन. पवार चितळीकर यांचे अभिनंदन केले.