
लोहा तालुक्यातील लव्हराळ येथुन सुरूवात
गोविंद पवार उपसंपादक नांदेड…
शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकापच्या युवा जोडो अभियानांचा प्रारंभ दि. ११ जुलै २०२३ पासुन लोहा तालुक्यातील मौजे लव्हराळ येथून झाला आहे.
शेकापचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील बाबर यांच्या संकल्पनेतून दि. ११ जुलै २०२३पासुन लोहा-कंधार मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने युवा जोडो अभियान सुरू करण्यात आले आहे.
सदरील युवा जोडो अभियानांचा प्रारंभ लोहा तालुक्यातील मौजे लव्हराळ येथून दि. ११ जुलै २०२३ रोजी शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आले.
तसेच प्रसंगी विक्रांतदादा मित्रमंडळाची स्थापना ही सौ.आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास बोरगाव आ.चे आदर्श सरपंच प्र. पुंडलिकराव पाटिल बोरगावकर,, शेकापचे लोहा तालूकाध्यक्ष नागेश पाटील हिलाल, या मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली.
यावेळी लव्हराळ येथील गावकरी मंडळी व शेकाप युवा शाखेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.