पालकांसह शाळकरी विद्यार्थ्यांची देखील ठिय्या आंदोलनास उपस्थिती.
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी समाधान कळम
भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे तात्काळ रिक्त पदे भरण्यासाठी बळीराजा चे अध्यक्ष नारायण लोखंडे यांच्या नेतृत्वात पालकांनी सोमवारपासून भोकरदन येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे , मात्र जोपर्यंत रिक्त पदे भरत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणारच असल्याचे बळीराजा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन उठणार नसल्याचे सांगितले. बुधवारी शिक्षणाधिकारी कैलास दातखिळे यांनीही आंदोलन स्थळी भेट दिली.तसेच आंदोलन माघे घेण्याची विनंती केली.परंतु कुठलाच ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन कर्त्यांनी माघार घेतली नाही. आंदोलनात बळीराजा फाउंडेशन चे अध्यक्ष नारायण लोखंडे यांची अचानक तब्बेत खालावली आहे, त्यांच्या वर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे , दरम्यान या आंदोलनाला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाही व आमच्या मागण्या पूर्ण होत नाही,तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः भेट देऊन मार्ग काढत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू राहणार असून लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास आक्रमक भूमिका घेणार असल्याचे बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी सांगितले.
