
दैनिक चालू वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – म्हसळा तालुक्यातील आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत मांदाटनेची स्वछ सर्वेक्षण ग्रामीण 20023 अंतर्गत राज्यस्तरीय समितीकडून पडताळणी करण्यात आली
आता पर्यंत मांदाटने ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा पुरस्कार, आदर्श गाव, कोरोना मुक्त गाव, तंटामुक्त गाव असे अनेक पुरस्कार या ग्रामपंचायतीस मिळालेले असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सतत राबविण्यात येत असतात.यात सरपंच श्री चंद्रकांत पवार, ग्रामसेवक श्री ठाकरे साहेब ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने अनेक योजना पूर्णत्वास नेह्ण्यास पारपडल्या नुकतंच ग्रामपंचायतने रेन वॉटर हार्वेस्टिंग चे अतिशय असे चांगल्या प्रकारचे मॉडेल तयार करून स्वच्छता समितीचे लक्ष वेधून घेतले तसेच संपूर्ण गावाची स्वच्छता उत्कृष्ठपणे ठेवल्याने कमिटीकडून ग्रामस्थांचे कौतुक करण्यात आले. या कमिटीचे प्रमुख श्री सत्यजित देशमुख औरंगाबाद, संवाद तञ् संजय वाघ, समाजशास्त्रद्न्य, वैशाली जगताप, सतीश राहणे, सुनील माळी, आनंद धीवर, ग्रामपंच्यात विस्तार अधिकारी डी. एन दिघीकर यांचा समावेश होता या वेळी श्रीपत मनवे,राजाराम धुमाळ,प्रदीप पवार, राजाराम दिवेकर, प्रकाश लाड, सूर्यकांत रिकामे, श्री बांद्रे, नीता पवार, धनश्री मुंढे, शुभांगी शिगवण, अशोक खरपुडी उपस्थित होते…