शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या प्रयत्नाला यश…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर शहर हे राज्याच्या दुर्गम भागातील तीन राज्याच्या सीमेवर वसलेले महत्त्वपूर्ण व्यापारी बाजारपेठेचे केंद्र म्हणून ओळखले जाते त्यामुळे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी देगलूर शहराला जिल्हा करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांना ई- मेलद्वारे काही दिवसापूर्वी दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद विभागाच्या महसूलच्या विभागीय उप आयुक्त तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी यांनी नादेडच्या मुख्यमंत्री जिल्हा सचिवालय कक्षाला देगलूर शहराला जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर उचित कारवाई करण्याचे आदेश एका पत्राद्वारे दिले आहे.
तेलंगाणा व कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेल्या देगलूरला शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळ- खले जाते आणि दोन्ही राज्यातून नागरिकांची ये-जा व देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होते. येथून जिल्ह्याचे ठिकाण ८० कि.मी. लांब अंतर असल्याने नागरिकांना असुविधा होत निर्माण होत असल्याने शिवसेना कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी दि. १३ जून रोजी देगलूर शहराला जिल्हा करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ई मेल द्वारे पाठवून दिले होते. त्या निवेदनाची दखल घेऊन मुख्यमंत्री सचिवालय कक्ष औरंगाबाद विभाग महसुलच्या विभागीय उप आयुक्त तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी यांनी निवासी उप जिल्हाधिकारी तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नांदेड यांना एका पत्रकाद्वारे धनाजी देगलूर शहराला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी केलेल्या निवेदनावर जिल्हास्तरीय सीएमओ कक्ष स्तरावरून नियमानुसार उचित कारवाई करून याबाबत संबंधितांना कळवावे, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नांदेड यांना दिले आहे…
