
दैनिक चालू वार्ता
नांदेड़ उत्तर जिला प्रतिनिधि समर्थ दादराव लोखंडे
भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्र राज्यचे माजी मुख्यमंत्री कै. शंकररावजी चव्हाण साहब यांची जयंती मोटा हातात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित बरबडा नगरीचे मा.भास्करराव धर्माधिकारी, संस्थेचे अध्यक्ष मा.शिवाजीराव धर्माधिकारी जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल नांदेड., माजी सरपंच मा.बालाजीराव मदेवाड,प्रकाशराव धर्माधिकारी,पठाण सर,अंबादासराव सर्जे व गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
*कै.डॉ. शंकररावजी चव्हाण साहेब* यांचा
‘जलसंस्कृतीचे जनक’असा गौरवपूर्ण उल्लेख होतो. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ही त्यांची घोषणा बोधवाक्य ठरली. अनेक प्रकल्पांच्या पूर्णतेसाठी साहेबांनी भगीरथ प्रयत्न केल्यामुळे त्यांचे नाव ‘आधुनिक भगीरथ’म्हणून आदरपूर्वक घेण्यात येते. तसेच सचिवालयाचे‘मंत्रालय’असे नामकरण श्रद्धेय कै.शंकररावजी चव्हाण साहेब यांच्याच कारकिर्दित झाले. साहेबांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची भरीव प्रगती झाली साहेबांनी आपल्या हयातीत डोंगराएवढी कामे केली, परंतु त्या कामाचा कधीही गाजावाजा केला नाही काम करताना निष्ठा व श्रद्धांशी तडजोड केली नाही साहेबांचे व्यक्तिमत्त्व, नेतृत्व आणि कर्तृत्व समाजाला सदैव सर्जनशीलतेची, उद्यमशीलतेची आणि सुसंस्काराची सदोदित प्रेरणा देत राहील… !
जलप्रने तथा आधुनिक महाराष्ट्र राज्याचे शिल्पाकार यांचा जयंती निमित्त अनेक मान्यवरानी विनम्र अभिवादन केले.