
धोकादायक टाकी पाडून सार्वजनिक वाचनालय बांधा : राहुल लोहबंदे…
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी शिवकुमार बिरादार
शहरातील प्रभाग क्र. १ मधील फुलेनगर भागातील मारोती मंदीरच्या पाठीमागे जीवन प्राधिकरण विभागाने अनेक वर्षापुर्वी पाण्याची टाकी बांधली. पण संबंधीत कंत्राटदार व अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे सदरील पाण्याची टाकी ही निकृष्ट दर्जाची व वापरण्यायोग्य नाही. म्हणून प्रशासनाने सदरील शोभेची वस्तू बनलेली पाण्याची टाकी पाडावी व त्या जागेवर सार्वजनिक वाचनालय बनवावे अशी मागणी नगर परिषद प्रशासनास निवेदनाद्वारे राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले.
पाण्याची साठवणूक करुन नागरिकांना नियमीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी शासनाच्या निधीतून १५-१६ वर्षापुर्वी जीवन प्राधिकरण विभागाने शहरातील फुलेनगर भागात मोठी पाण्याची टाकी बांधली. पण संबंधित कंत्राटदार व अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे सदरील पाण्याची टाकी ही निकृष्ट दर्जाची व वापरण्यायोग्य नाही. म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर सदरील शोभेची वस्तू बनलेली पाण्याची टाकी पाडावी व त्याठिकाणी सार्वजनिक वाचनालय बांधावे अश्या मागणीचे निवेदन नगर परिषद प्रशासनास राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आले. निवेदनावर अशितोष कांबळे, अनिल बनसोडे, परमेश्वर कांबळे, राहुल चावरे, सतिष सोनकांबळे , शंकर चौडेकर, बालाजी माचेवाड, अशोक चावरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत…