
दै.चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड ( देगलूर ) : दिनांक १७ जुलै २०२३ रोजी देगलूर तालुक्यातील सर्व शासकीय दोनकार्यालयात येणाऱ्या सर्व सामान्य जनतेच्या समस्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाणून घ्याव्यात तसेच त्याचे समस्याचे निराकरण करावे यासाठी देगलूर येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्फत जनता दरबार भरवण्यात आला होता .प्रशासनात आलेली मरगळपना दूर व्हावी तसेच जनता दरबारात ज्या ज्या तक्रारी आल्या आहेत त्या अनुशंगाने संबधित विभागांने पाच दिवसात त्याचा निपटारा करावा व तसा अहवाल सादर करावा असी सुचना जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकरनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दिले त्यावेळी या जनता दरबारा मध्ये एक रुपयात शेतकऱ्यांना मिळणारा पीक विम्या बद्दल होणारी पिळवणू कघरकुल धारकांना ६०० रुपयात १ ब्रास वाळू मिळण्याबाबत व खानापूर एकलारा मुखेड रस्ता देगलूर मुक्रामाबाद उदगीर रस्त्याचे तसेच अनेक गावातील पाणी प्रश्न पादन रस्ता व शहरातील सार्वजनिक शौचालय नाली बांधकाम व सिमेंट रस्ते शहरातील विविध ठिकाणी झालेले अतिक्रमण याबद्दल जनतेने खा. चिखलीकरान समोर समस्या मांडल्या. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी , पोलीस निरीक्षक आरोग्य विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता , जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता , पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता , विद्युत मंडळाचे उपकार्यकारी अभियंता, गटशिक्षणाधिकारी , केंद्र प्रमुख ,सामाजिक वनीकरण सर्व अधिकारी उपस्थित होते तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता सुरू झालेला जनता दरबार तीन तासाहून अधिक वेळ चालला .स्वतः जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विभाग निहाय कामाचा आढावा घेतला उपस्थित नागरिकांनी आपआपल्या अडीअडचणी सांगितल्या जाग्यावरच काही तक्रारींचे निराकरण झाले.प्रशासनातील मरगळपना दूर करून जनतेच्या अडीअडचणी वेळेत सोडवाव्यात तसेच येथे आलेल्या तक्रारी चे आठ दिवसात निपटारा करून संबंधितांना कळवावे असी सूचना प्रतापराव पाटील यांनी अधिकारी कर्मचारी याना दिल्या
विद्युत विभाग-कृषी विभागाच्या तक्रारी अधिक
होत्या . यामुळे संबंधित अधिकारी यांना मंगळवार ते शनिवार कार्यालयात थांबुन तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना केली.या अनुशंगाने ज्याच्या त्याच्या तक्रारी आहेत त्यांनी मंगळवार पासून तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कृषी अधिकारी यांच्या समक्ष आपले म्हणणे सांगावे त्याच्या समस्यांचे निराकरण केले जाईल असे निर्देश खा चिखलीकर यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या . देगलूर तालुक्यातील व शहरातील जनतेला या जनता दरबाराचा मोठा प्रमाणात फायदा झाला.