
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:- पावसाळ्याची सुरवात झाली तसे साप आढळण्याचे प्रमाणही वाढते पाऊस पडल्यामुळे सापांना राहण्यासाठी असणारी बिळे बंद झाली आहेत त्यांनी सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे.अश्यात गत आठवड्यात अहमदपूर, चाकूर, जळकोट परिसरात तबल 40 बिनविषारी तर 16 विषारी साप पकडण्यात आले. तसेच आपल्या परिसरात धामण,गवत्या,तस्कर,डुरक्याघोणस,दिवड,कवड्या, नानेटी, कुकरी,धुळणगीन,मांडुळ, कुकरी,इत्यादी,व विषारी मध्ये नाग,मण्यार,फुरसे,घोणस, हे प्रामुख्याने विषारी साप आढळतात घरात साप आल्यास काय कराल साप घरात आल्यास घाबरू नका शांत राहा त्याला न मारता आपल्या जवळच्या जाणकार सर्पमित्राला बोलवा सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून सापावर लक्ष ठेवा लहान मुले पाळीव प्राणी याना सापापासून दूर ठेवा.जेणे करून त्यांना अपाय होणार नाही सापाचा जवळ जाण्याचा फोटो काढण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका.अश्या वेळेस साप चिडून तुमच्यावर हल्ला करू शकतो नाग, मण्यार, घोणस’ फुरसे, हे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख साप आहेत याचा दंश प्राणघातक असतो अश्या सापापासून सावध रहावे. सापांना मारू नका मारण्यापेक्षा वाचवण्यात खरा आनंद या विचाराला सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करूया पावसाळ्याचे दिवसात मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढते आणि यातूनच सापांना मारण्याच्या घटनामध्ये वाढ होते व सर्पदंशाच्या घटना सुद्धा वाढतात व या दिवसात बऱ्याच सापांचा प्रजनन काळ असतो म्हणून या काळात नागरिकाने साप दिसला तर घाबरून न जाता आमच्या सर्पमित्र शिरूरकर ग्रुप शी संपर्क साधावा आमचा हेल्पलाईन क्र:-7709779798 सर्पमित्र प्राणीमित्र अमोल शिरूरकर..