
पांगराच्या स्नेह मेळाव्यातून घराणेशाहीला शह देण्यासाठी महादेव मंदिरात ‘महादेवाला’ साक्षी ठेवून एकनाथ ‘दादा’ ला आमदार करण्याची प्रतिज्ञा घेत कार्यकर्त्यांचा उमटला एकमुखी सूर…
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
अनेक वर्षांपासून कंधार लोहा तालुक्याच्या विकासाचा बॅक लॉग असून तो भरून काढायचा असेल तर या मतदारसंघाला एकनाथ दादा पवार यांच्या शिवाय पर्याय नाही. ते सत्तेत नसतानाही मतदार संघातील अनेक ग्रामपंचायतीला शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकास काय असतो? आणि तो कसा करायचा असतो? याचा उत्तम आदर्श म्हणजे ‘दादा’च आहेत, असा सामूहिक सूर पांगरा येथील सभेत उमटून दोन हजारांच्या वर असलेल्या नागरिकांनी दादाला आमदार करण्याची महादेवाला साक्षी ठेवून प्रतिज्ञा घेतली.
एकनाथ दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कंधार तालुक्यातील पांगरा येथील महादेव मंदिरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी स्नेह मेळावा व डब्बा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पांगरा येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष घोरबांड हे होते. तर प्रमुख उपस्थितीत भाजपाचे ज्येष्ठ नेते केरबा सावकार बिडवेई, देवीदास महाराज गिते, सदाशिव अंभुरे, दत्ताभाऊ शेंबाळे, बालाजी परदेशी,व्यंकट गव्हाणे, ब्रह्मानंद सिरसाट,माधव जाधव, प्रा. कंटिराम लुंगारे,जलदूत बसवदे, शितळे, दिगंबर लुंगारे, नागनाथ चुडावकर, गजानन मोरे, बजरंग यादव, आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
‘एकच वादा एकनाथ दादा” च्या घोषणा…!
यावेळी दादानी चिंचवड महानगर पालिकेला आशिया खंडातील सर्वात मोठी चिंचवड महानगर पालिका म्हणून वैभव प्राप्त करून दिले.एक सोज्वळ, शेतकऱ्यांना हमी भाव देणारा, विकास काय असतो ते दाखवून देणारा, सच्चा, समाजाबद्दल तळमळ असलेला, तालुक्यातील घराणेशाहीवर पाबंदी घालू शकणारा, रोजगार निर्माण कराणारा,आपला विचार करणारा, मतदारांना खाली बघू देण्याची वेळ येऊ न देणारा नेता आहे.
तालुक्यातील २५हजार तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणारा, दूरदृष्टी असलेला नेता म्हणजे एकनाथ दादा पवार आहेत, याही पुढे जाऊन आता ‘एकच वादा एकनाथ दादा’ अशा प्रतिक्रिया आपल्या मनोगतातून सदाशिव अंभुरे, धर्मवीर संघटनेचे बाळासाहेब जाधव, व्यंकट गव्हाणे, दत्ताभाऊ शेंबाळे, बालाजी परदेशी, देवीदास महाराज गिते, व्यंकट गव्हाणे, ब्रह्मानंद सिरसाट,केरबा सावकार बिडवई आदिंनी नोंदविल्या.
*हे* *ज्येष्ठ नेते म्हणजे ‘अंगार’* *आहेत….!*
पांगरा येथील सभेत एकनाथ दादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व मूळ भाजपा जपणारे, वाढवणारे भाजपाचे केरबा सावकार बिडवई, देवीदास महाराज गिते, सदाशिव अंभुरे, प्रा. कंटिराम लुंगारे, नागनाथ चुडावकर व त्यांचे सर्व सहकारी हे अंगार आहेत. ते आता एकनाथ दादा पवार यांच्या आमदारकीच्या विजयासाठी सरसावले आहेत. ‘आता एकच वादा, कंधार लोह्याचा आमदार एकनाथ दादा !’ अशी घोषणा देवीदास महाराज गिते यांनी तर ‘एकच वादा एकनाथ दादा’ अशी घोषणा दत्ताभाऊ शेंबाळे यांनी यावेळी दिली. तर अनुसूचित जाती जमाती सेल चे माधव जाधव यांनी लोहा कंधार तालुक्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मन्याडखोरी शैलीत आपली तोफ डागून एकनाथ दादा पवार यांच्या विजयासाठी सरसावले. त्यानंतर एकनाथ दादा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून विकासाची दिशा व आपल्या उमेवारीची पक्की असल्याचे निक्षून सांगितले.आपल्या कार्यकर्त्याच्या नादाला कोणीही लागू नये नाहीतर त्यांना घोडा लावू अशी ताकिही दिली.
पांगरा येथील या मेळाव्यास मतदारसंघातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, तसेच सोसायटचे चेअरमन, ज्येष्ठ नागरिक, तरूण कार्यकर्ते यांच्यासह दोन हजारांच्या जनसमुदायाची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून किशन टोणगे यांनी आभार मानले…