दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बीड अंबाजोगाई
अंबाजोगाई शहरातील जिजाऊ विद्यालयात एम.टी.एस ओलंपियाड स्पर्धेत लौकिक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी उत्साहात संपन्न झाला. या परीक्षेमध्ये जिजाऊ विद्यालयाचे एकूण 14 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह यशस्वी झालेले आहेत यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या बारव संवर्धन समितीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते ॲड.राजेंद्रप्रसाद धायगुडे तसेच एम.टी.एस स्पर्धा परीक्षेचे समन्वयक संतोष राऊत शांतीदूत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव लोंढाळ, जिजाऊ विद्यालयाचे संस्थापक ॲड.दयानंद लोंढाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या लौकिक यशाबद्दल त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ॲड.धायगुडे यानी जिजाऊ विद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंद व प्रशासनाचेही कौतुक केले.तसेच येत्या काळात हे विद्यार्थी चांगले अधिकारी होऊन देश सेवा करतील असेही ते म्हणाले.
या गुणगौरव सोहळ्याचे उत्तम सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापिका मोहिनी जाधव यांनी तर आभार रंजना माळी यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारिका चौधरी अनुराधा काळे मयुरी केंद्रे अनुराधा पांचाळ यांनी परिश्रम घेतले…
