दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी बापु बोराटे
पुणे इंदापूर: श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र आरण येथून संपूर्ण राज्यातून पायी ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना इंदापूर आठभाई मळा येथील माळी समाज बांधवांच्या वतीने अल्पोपहार चे वाटप पुणे सोलापूर हायवे, इंदापूर येथील महात्मा फुले चौक या ठिकाणी करण्यात आले. यावेळी विविध गावातून आलेल्या भाविकांना चहा ,पोहे,फळे,शिरा चे वाटप करण्यात आले या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री प्रदीप दादा गारटकर, इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री विठ्ठल आप्पा ननवरे, माजी उपनगराध्यक्ष बाबू गवळी, नगरसेवक श्री दादासाहेब सोनवणे, ॲड नितीन राजगुरू, शिवसेनेचे इंदापूर शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, मूकबधिर शाळेचे प्राध्यापक उन्हाळे सर, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष इंदापूर श्री सुभाष खरे राष्ट्रवादीचे नगरसेवक मखरे सर, आदी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्तींनी भेट देऊन या कार्यास शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी विकास शिंदे यांच्याशी बोलून पुढील वर्षी जे काय या कार्यासाठी तुम्हाला सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य आम्ही करू असे सांगून या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांच्या पाठीवरती थाप टाकून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे हे पहिलेच वर्ष होते तरी या कार्यक्रमास सर्वांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे आणि हा कार्यक्रम इथून पुढे प्रत्येक वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाणार आहे, असे विकास शिंदे व युवराज शिंदे यांनी सांगितले.
या ठिकाणी नाशिक, सिन्नर, दौंड ,माळवाडी ,खंडाळा, सातारा ,बनकरवाडी, शेळगाव त्याच बरोबर अनेक गावांत ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांनी या ठिकाणी भेट देऊन अल्पोपहार चा आस्वाद घेत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास शिंदे, ॲड.नितीन राजगुरू,नागेश शिंदे, तुकाराम शिंदे (भाऊ), युवराज शिंदे, गणेश सुरेश राऊत विष्णू शिंदे, रामचंद्र शिंदे, राजू शिंदे, निखिल शिंदे, गणेश राऊत, तुषार ढगे, अक्षय नागेश शिंदे, गणेश सुरेश, राऊत सुरज, शिंदे अक्षय, शिंदे सोहम, शिंदे संदीप, शिंदे तुषार, सुरेश व्यवहारे, मोहित शिंदे सूर्यकांत शिंदे,ललित शिंदे, सुमित शिंदे, संजय शिंदे,सोमनाथ रासकर, योगेश रासकर,गोट्या रासकर, बापूराव शिंदे, रवी शिंदे ,बापू सावता शिंदे,सौरभ शिंदे , शंकर शिंदे,रमेश शिंदे, रवी शिंदे, अमोल भगवान शिंदे,ललेंद्र शिंदे, अमोल शिंदे, भागवत शिंदे ,गणेश शिंदे मोहित शिंदे, संजय रासकर, विकास घुगे सर,लालासो ढगे, अमित शिंदे आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले. तसेच पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिंदे, व पोलीस कॉन्स्टेबल गजानन शिंदे मच्छिंद्र शिंदे निखिल कुलथे यांनी देखील आर्थिक मदत करून फोनवरून शुभेच्छा दिल्या तसेच उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी अल्पोहार व इतर सर्व काही गोष्टी नागेश शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले…
