
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव उस्मानाबाद:-भूम तालुक्यातील आंबी येथे मोफत अस्थिरोग निदान शिबिर शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,जिल्ह्याची लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झाले.बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत असणारे अस्थिरोग विभाग तज्ञ डॉक्टर अभिजीत साळुंखे यांनी जवळपास २१४ रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात आले.सदरील शिबिराचे उद्घाटन सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज व स्व.हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून संपन्न झाले.साधारण ४ तास चालू असलेल्या शिबिरामध्ये हाडांच्या आजाराविषयी अनेक व्याधी असलेले रुग्ण यांनी गर्दी केली होती,शांततेत सर्व रुग्णांना तपासून त्याचे निदान करून त्यांना काही दिवसाचा औषधोपचार ही मोफत देण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे, विधानसभा समन्वयक दिलीप शाळू महाराज,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते केशव नाना चव्हाण, विधान सभा भुम परंडा वाशी अध्यक्ष प्रल्हाद अडागळे,डॉ भोगील सर,डॉ.ऋषी डोके आदी उपस्थित होते.शिबिर यशस्वीतेसाठी शिवसेना उपतालुकाप्रमुख अविनाश गटकळ,गणप्रमुख जावेद तांबोळी, बळीराम गटकळ,बापूराव गटकळ, विकासराव पाटील,किसनराव गटकळ यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक व ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले.ग्रामीण भाग असताना अस्थिरोग तज्ञ यांनी वेळ देऊन नागरिकांची तपासणी केल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले…