दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी): भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा,सुशासन आणि गरीब कल्याण योजनांचा धडका सद्यपरिस्थितीत दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्रात जोरात सुरू आहे.अश्यातच आगामी निवडणुका,कार्यकर्ता संघटन,पक्ष संघटन तसेच सामान्यांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहचविण्यासाठी विधानसभा प्रमुख गोपाल चंदन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.
मोदी@9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत सेवा,सुशासन आणि गरीब कल्याण योजना मोदी सरकार शेवटच्या घटकापर्यंत कश्या पद्धतीने पोहचली याचा प्रचार दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्रात सुरू आहे.दरम्यान विधानसभा प्रमुख गोपाल चंदन अंजनगाव सुर्जी दौऱ्यावर असताना तालुक्यातील कारला येथे डबा पार्टी बैठक आयोजित करण्यात आली होती.डबा पार्टी बैठकीचे आयोजन नेता ते कार्यकर्ता आणि त्यामध्यामातून सामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचा ध्यास हे केंद्र सरकारचे उदिष्ट असून सामान्यांच्या प्रश्न समजून केंद्र सरकारच्या योजना कश्याप्रकारे पोहचविता येतील यावर विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी भर दिला.
डबा पार्टी बैठक आटपून गोपाल चंदन हे थेट सामान्य जनतेपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नाने कारला येथे घरोघरी जाऊन केंद्र सरकारच्या योजना जनतेला समजाऊन सांगण्यासाठी प्रचार प्रसार केला आणि तेथून ते थेट पोहचले ते शेतकऱ्यांच्या बांधावर.शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता केंद्र सरकार कश्या प्रकारे त्यांच्या पाठीशी उभी आहे.तसेच त्यांना कोण-कोणत्या योजना लाभकारी ठरणार त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता वरिष्ठान सोबत चर्चा करणार असल्याचे यावेळी विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी म्हटले.
याप्रसंगी माजी आमदार रमेश बुंदीले,विधानसभा प्रमुख गोपाल चंदन,ॲड.पद्माकर सांगोळे जिल्हा सचिव,मनीष मेन जिल्हाध्यक्ष भाजयुमो,मदनराव बायस्कर तालुकाध्यक्ष दर्यापूर,ज्ञानेश्वर दाळू अंजनगाव सुर्जी,ज्येष्ठ नेते नंदू काळे,अतुल गोळे ता.सरचिटणीस,संतोष काळे ता.सरचिटणीस,सतीश मट्टे जिल्हा सरचिटणीस किसान मोर्चा,मिलिंद गोतमारे जिल्हा सचिव किसान मोर्चा,धीरज भागवतकर सो.मी.प्रमुख,प्रवीण टाले किसान मोर्चा,रतन भास्कर शहराध्यक्ष किसन मोर्चा,भूषण चौखंडे,किशोर देशमुख,नंदकिशोर चिंचोळकर,अमोल भोपळे आदी कार्यकर्ते व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते…
