दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक परीक्षेत भूम येथील स्वप्नील नवनाथ बाराते यांची मंत्रालय येथे टंकलेखक म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा.डॉ.तानाजीराव सावंत युवा मंचाच्या वतीने सत्कार करण्यात आला.स्वप्नील बाराते यांच्या वडिलांच्या निधना नंतर घरची सर्व जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर पडली. त्यातच त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला.अश्या वाईट परिस्थितीवर मात करत स्वप्नील यांनी अभ्यास करत परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले.दरम्यान नूतन टंकलेखक पदी नियुक्ती झालेले स्वप्नील बाराते यांचा प्रा.डॉ.तानाजीराव सावंत युवा मंचचे अध्यक्ष प्रभाकर शेंडगे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी पांडुरंग धस,विकास बाबर, अमर भगत, मुकेश भगत, सोनम बनसोडे, अमोल भसाड, आदी युवा मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते…
