
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
भूम:-प्रत्येकाला नोकरी मिळणे अशक्य आहे, तेव्हा आपल्या आवडीचा व्यवसाय निवडावा, त्याच्यातले बारकावे जाणून घ्यावे, थोडासा अभ्यास करावा आणि व्यवसायाला सुरुवात करून प्रामाणिकपणे ग्राहकांची सेवा करावी तरच निश्चितपणे आयुष्यात सोनेरी दिवस पाहायला मिळतील असा विश्वास जिल्हा उद्योग केंद्राचे धाराशिव आणि परभणी जिल्ह्याचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलताना केले.रविवार दि.16 जुलै 23 रोजी कोष्टी समाजाच्यावतीने समाजातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा येथेच्छ सन्मान केला. याबरोबरच गोरगरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी धाराशिव व परभणी जिल्ह्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, सोलापूरचे युवा उद्योजक विजय कलढोणे,युवा उद्योजक संजय नवले, लातूरचे प्रा. शिवाजी मोहाळे, कोष्टी समाज ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब फलके आदिंची उपस्थिती होती.यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, नोकरीमध्ये करिअर करणे शक्य आहे. प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही, उद्योग व्यवसाय मात्र प्रत्येक जण करू शकतो , यासाठी शासनाकडे जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून छोट्या मोठ्या अनेक योजना आहेत, याचा पुरेपूर फायदा नव उद्योजकांनी करून घ्यावा, त्याच्यासाठी आवश्यक असलेली माहिती, प्रशिक्षण हे देखील शासनाकडून मोफत दिले जाते. याचवेळी त्यांनी टाटा, बिर्ला अंबानी सारखे अनेक उद्योजक हे देखील अल्पशा भांडवलातच सुरुवातीला व्यवसाय सुरू करून मोठे झालेले आहेत याची उदाहरणे दिले.कार्यक्रमातून वन अधिकारी बी व्ही सदाफळे याच्या योगदानातून तब्बल 35 हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य समाजातील गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना वाटप केले, यामध्ये महागडी स्कूल बॅग, रजिस्टर, पेन, छत्री आणि पॅड या वस्तूंचा समावेश होता.या कार्यक्रमा दरम्यान पालक वर्गांचीही मोठी उपस्थिती होती,कार्यक्रमाचं प्रस्ताविक शंकर खामकर यांनी केले तर सूत्रसंचलन विठ्ठल बागडे यांनी केले, आभार उमेश ढगे यांनी मांनले…