
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-भूम तालुक्यातील ईट येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवसेना युवासेना यांच्या वतीने मोफत कराटे शिबिराच्या आयोजन करण्यात आले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त IJKA कराटे संघटनेचे सेक्रेटरी दत्ता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव अंधारे व बालाजी राठोड यांनी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षणाची विविध प्रात्यक्षिके सादर केली.21व्या शतकामध्ये वावरत असताना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कराटेची अत्यंत गरज असून त्याचे ज्ञान घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी प्रशिक्षकांनी व्यक्त केले.या कराटे शिबिरामध्ये मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी अतिशय थरारक प्रात्यक्षिके सादर करून,स्वतःला सुरक्षित कसे ठेवता येईल याचेही उत्तम मार्गदर्शन कराटेच्या माध्यमातून प्रशिक्षकांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा युवासेनाा जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे, विधानसभेचे समन्वयक दिलीप शाळू महाराज,विधानसभेचे युवा अधिकारी प्रल्हाद अडागळे,शिवसेनेचे मा.तालुकाप्रमुख अनिल शेंडगे,शिवसेनेचे जेष्ठ नेते केशव नाना चव्हाण,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अविनाश बापू गटकळ,युवासेनेचे उपतालुकाप्रमुख शंकरराव गपाट,अनिल तात्या तीकटे आधी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नेते केशव चव्हाण यांच्यासह अशोक माने, शितल बोंदार्डे,बारुक माळी,चंद्रकांत चव्हाण, प्रवीण भोसले,शज्योतीराम तावरे तसेच परिसरातील शिवसैनिक युवासैनिक आदींनी परिश्रम घेतले.हिंदुरुदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण व 20 टक्के राजकारण या विचाराला अनुसरून अनेक सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतील असे मत शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.तसेच
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कराटेचा अभिनव उपक्रम राबविल्याने विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले..