दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा/ सुरेश ज्ञा.दवणे..
जालना.. मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माळतोंडी येथे जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोमवार रोजी शाळेच्या प्रांगणामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा जनजागृती अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थी बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेतली यावेळी मुख्याध्यापक कारभारी ढाकणे यांनी सांगितले की, आपल्या गावात होणाऱ्या बालविवाह रोखण्यासाठी सर्वांना महत्व पटवून द्या व मुलींना शाळेत शिकू द्या शिक्षणामुळे प्रगती होते. गावात बालविवाह रोखण्या.साठी हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर संपर्क करावा नाव गुपित ठेवले जाते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कारभारी ढाकणे, राहुल काळे अनिल बुरकुले,कालिदास दडस,तुकाराम कराळे,अंकुश राठोड अंगणवाडी कार्यकर्ते संगीता राठोड अलका अंभोरे मदतनीस राधाबाई काळे, फुलाबाई काळे यांची उपस्थिती होती…
