दैनिक चालू वार्ता
अहमदपूर शहर प्रतिनिधी हाणमंत जी सोमवारे
अहमदपूर तालुक्यातील हा मोठा भौगोलिक परिस्थितीचा तालुका म्हणून ओळखला जातो, म्हणून शैक्षणिक वर्ष 2023/24 या वर्षात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची असलेली कमतरता विचारात घेऊन यंदा अहमदपूर तालुक्यातील दोन शिक्षणविस्तार अधिकारी रुजू झाले यावेळी गटसाधन केंद्र येथे कार्यालयीन प्रमुख गटशिक्षणाधिकारी मा श्नी बबनरावजी ढोकाडे साहेब यांची हस्ते शाल. श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे, त्याप्रमाणे तालुक्यातील कार्यालयीन अधिकारी उदा लिपिक व शिपाई.शाळावार ,सय्याक शिक्षक ते पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असतात आणि आताच्या पिढीला जलद व लवकर संकल्पना समजून घेण्यासाठी शिक्षकाची भूमिका फार महत्वाची आहे, म्हणून अहमदपूर तालुक्यातील नुकतीच रुजू झालेली नूतन शिक्षण विस्तार अधिकारी मा श्री मन्नन जी शेख बीट किनगांव ता अहमदपूर तर मा श्री भिंगोले व्ही एम सर यांच्या नवनियुक्ताने शैक्षणिक वर्ष 2023/24 साठी उत्कृष्ट काम करण्याची संधी आम्हास प्राप्त झाली आहे, म्हणून पुढील काळात प्रभावी कार्याची अंमलबजावणी व संनियंत्रण तथा मार्गदर्शन करणार आसे उदगार काढले आहेत दरम्यान या वेळी तालुक्यातील सर्व केंद्रीय प्रमुख तथा व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते…
