दै.चालु वार्ता
चाकूर तालुका प्रतिनिधी किशन वडारे
दि.१५ जुलै रोजी भारतीय स्टेट बँक चाकूर व उमेद यांच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृह चाकूर येथे तालुक्यातील बचत गटांना कर्ज वाटप करण्यासाठी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये तालुक्यातील २५ महिला स्वयंसहायता समूह यांना ७० लाख रुपयाचे कर्जाचे वाटप करण्यात आले. भारतीय स्टेट बँक क्षत्रिय कार्यालय अंतर्गत १३१ महिला बचत गटांना ३,७०,००,०००/–रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महाव्यवस्थापक मेरी सग्गया धनपाल मॅडम एलएचओ महाराष्ट्र,उपमहाव्यवस्थापक प्रियकुमार सरीगाला एओ नांदेड, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रवीण कुमार मांडेकर आरबीओ लातूर, जिल्हा अभियान प्रमुख देवकुमार कांबळे,मनोजकुमार सूर्यवंशी आरबीओ लातूर व भारतीय स्टेट बँक शाखा चाकूरचे (मॅनेजर)शाखा व्यवस्थापक इत्यादींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली व कार्यक्रमाचे सूत्र संचलन मनोजकुमार सूर्यवंशी आरबीओ लातूर यांनी केले.
कार्यक्रमाअंतर्गत भारतीय स्टेट बँकेच्या महाव्यवस्थापक मेरी सग्गया धनपाल मॅडम एलएचओ महाराष्ट्र यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करत असताना बॅंकेतील विविध योजनांविषयी माहिती दिली त्यात, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना वार्षिक प्रीमियम २० रुपये त्याचे स्वरूप प्रतिवर्षी २० रुपये खात्यातून वजा होतात व अपघात झाल्यानंतर दोन लाख रुपये विमा संरक्षण असे असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील प्रत्येक नागरिकांनी परवडणारी व फायदेशीर आहे व ही योजना प्रत्येकाने घेणे अत्यावश्यक आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना वार्षिक ४३६ रुपयांच्या प्रीमियमवर दरवर्षी २ लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. पॉलिसीधा..
