
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त शेटफळ हवेली येथील उमाजी नाईक ग्रुप यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद च्या वस्ती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी शेटफळ हवेली गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय शिंदे, सरपंच संतोष पवार,ग्रा.पं.सदस्य महेश नरबट, माजी ग्रा.पं.सदस्य नाना चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिंदे, जय मल्हार क्रांती संघटनेचे इंदापूर तालुका युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण, स्वप्निल करगळ, विजय शिंदे,जय मल्हार क्रांती संघटनेचे इंदापूर तालुका युवक अध्यक्ष रोहित चव्हाण, सचिन भडंलकर, सोनबा मंडले, लक्ष्मण चव्हाण सदस्य सिंहा फाउंडेशन, आजिनाथ कानगुडे, राजु शिंदे, आण्णा कांबळे, संतोष वाघमोडे,सागर वाघमोडे,सोनू जाधव तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.