
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली : वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या १४ जुलै २०२३ रोजी हॉटेल सीझन्स २४, वाघोली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुढील एक वर्षांसाठी २०२३ ते २०२४ सालासाठी सर्वानुमते सर्व २२३ सदस्यांनी एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती असोसिएशनचे संस्थापक डॉ. विनोद सातव पाटील यांनी दिली.
वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी केअर हॉस्पिटलचे डॉ. भूषण विधाते, सचिवपदी डॉ. मच्छिंद्र काशीद, कोषपाल डॉ. नितीन पवार, उपाध्यक्ष डॉ. बंडू कराळे आणि डॉ. हेमंत विभुते, सहसचिव डॉ. अतुल जाधव, सहकोषपाल डॉ. राहुल शिंदे तसेच विविध कमिटीवर विविध डॉक्टरांची निवड करण्यात आली. असोसिएशनचे हे बारावे वर्ष असून २२३ सदस्यसंख्या आहे. असोसिएशनच्या माध्यमातून वेगवेगळे सीएमई, आरोग्यशिबिरे, डॉक्टर्स डे, स्पोर्ट्सव सांस्कृतिक कार्यक्रम, बोगस डॉक्टर पकडून देणे, सहली यांचे आयोजन केले जाते.
सोशल आणि सांस्कृतिक कमिटी- डॉ. चेतन कोलते, डॉ. लक्ष्मीकांत बेहेळे, डॉ. पल्लवी मेहेरे, डॉ. वैशाली जायकर, डॉ. सायली भुजबळ. स्पोर्ट्स कमिटी- डॉ. ज्ञानेश्वर खरात, डॉ. विजयकुमार गुट्टे, डॉ. कपिल जुमले, डॉ. प्रवीण काकडे. *मेडिकोलिगल कमिटी- डॉ. रघुनाथ रामकर, डॉ. शंकर वावरे, डॉ. चेतन जायकर, डॉ. दीपक नरनवरे. वुमेन्स फोरम- डॉ. दाफिया चिंचणीकर, डॉ. धनश्री शिंदे, डॉ. रुचा कोलते, डॉ. ज्योती जाधव.