
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: दि.१८जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजून ७मी. अधिक श्रावण मासारंभ या शुभ मुहूर्तावर नरसिंह प्रतिष्ठान ,नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्या वतीने श्री गणेश मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले.सर्व समाजाला हितकारक, दिशा देणारे,संस्कृतीचे रक्षण करणारे या पद्धतीने मंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे.
बऱ्याच वर्षा पासून नरसिंह नगर येथील महिलांची सार्वजनिक गणपती मंदीर बांधण्याची मागणी होती.प्रत्येक वर्षी मिरवणूक काढून खुप मोठा प्रमाणात खर्च केला जातो. यावर्षी मिरवणूक न कढता जो काय होणारा अनावश्यक खर्च आहे, तो मंदिर उभारणीसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे नरसिंह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मंडळाचे शिल्लक असलेले पैशातून उभारणीचे काम आज सुरु केले असून सदर मंदिरासाठी अंदाजे दहा ते अकरा लाख रुपये खर्च येणार आहे.
सदरचे काम लोकसहभागातून व्हावे यासाठी टेंभुर्णी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी गणेश भक्तांनी स्वईच्छेने मदत करण्याचे आवाहन नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.
श्री.गणेश मंदीर भूमिपूजना वेळी टेंभुर्णी शहरातील प्रतिष्ठित नागरिक सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तसेच अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज, टेंभुर्णी चे सर्व कार्यकर्ते व नरसिंह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…