
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज इंदापूर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास माळी महासंघ, इंदापूर नागरी संघर्ष समिती,मानव विकास परिषद या संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा ताटे यांनी सांगितले,आजच्या युगात पुरोगामीचा डंका वाजवला जात आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारे साहित्यिक होते.ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसुन ती गोरगरीबांच्या तळहातावर तरली आहे असे सांगून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारा युगप्रवर्तक महापुरुषांच्या यादीतील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हे एक नाव होय.त्यांच्यामध्ये वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी होती. प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, सर्वसमावेशकविचार त्यांनी मांडला. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे या जागतिक कीर्तीच्या साहित्यिकाने प्रगतिवादी लेखन करून समाज प्रबोधन केले आहे. जागतिक कीर्तीचे साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांनी जीवनजाणीवेसह सामाजिक संवेदनातून जी साहित्यनिर्मिती केली, ती परिवर्तनवादी आहे. साहित्यातून वंचित, भटकेविमुक्त, कष्टकरी समाजातील, जीवन त्यांनी चित्रित केले. गावकुसाबाहेरील माणसांना साहित्यात आणून त्यांचे वास्तव जीवन समाजासमोर मांडले. परिवर्तनवादी व मानवतावादी दृष्टिकोनातून लेखन करून उपेक्षित, वंचित, कष्टकर्यांना माणूसपण बहाल केले. समाजव्यवस्थेत आजपर्यंत दुय्यम दर्जा असणार्या स्त्री वर्गाचे संघर्षमय जीवन चित्रित करताना सकारात्मकता, आशावाद त्यांनी प्रकट केला आहे.लेखणीसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विविधांगी साहित्याचे अवलोकन केल्यास असे लक्षात येते की, नवक्रांतीसाठी, कालानुरूप वाटचालीसाठी लोकांना प्रवृत्त करण्यास त्यांनी साहित्यातून दिशा दिली. पारंपरिक तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर केले. नाटके, पोवाडे, कथा-कादंबर्या, प्रबोधनपर गीते ही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांशी निगडित असून पुरोगामित्व प्रदर्शित करणारे आहेत. अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यातील अग्रेसर साहित्यिक होते.
यावेळी इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा ताटे,माळी महासंघाचे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विकास शिंदे, मानव विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश सचिव रेश्मा शेख,राष्ट्रसेवा दल राज्य संघटक कपूर सय्यद,राष्ट्रसेवा दल कार्याध्यक्ष रमेश आबा शिंदे,माळी महासंघ उपाध्यक्ष युवराज शिंदे, तालुका अध्यक्ष गणेश राऊत, ॲड. रेश्मा गार्डे, मानव विकास परिषद जिल्हा सल्लागार ॲड.रेश्मा गार्डे, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष सुभाष खरे, कीर्ती कुमार वाघमारे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, आरपीआय पदाधिकारी शिवाजी मखरे, सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आत्तार, प्राध्यापक महादेव चव्हाण,संदिपान कडवळे,विकास संदिपान शिंदे,विजय डावरे,महासंघाचे पदाधिकारी सूर्यकांत शिंदे,सुरज शिंदे,संदीप शिंदे,कुमार शिरसागर,तुषार ढगे,शंकर शिंदे,सौरभ शिंदे,नागेश शिंदे,निखिल शिंदे,रामचंद्र शिंदे,राजेश शिंदे,भाऊ पाटोळे,विष्णु शिंदे,भागवत शिंदे,अनिकेत शिंदे,किरण शिंदे,संतोष शिंदे,सुमित शिंदे तसेच इतर पदाधिकारी अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.