
विद्यार्थी व प्रवाशांची होतेयं गैरसोय…
प्रवाश्यांना खाजगी वाहनातून मोजावी लागते दीडपट रक्कम..
दै.चालु वार्ता
ता.प्रतिनिधी चिखलदरा
प्रवीण मुंडे
अमरावती (चिखलदरा) : जिल्ह्यातील परतवाडा आगाराची दैनंदिन सकाळी भुतरुम ते परतवाडा मार्गावर एक मात्र एसटी बस आहे आणि चांदूरबाजार आगाराची भांडूम-परतवाडा-चांदूरबाजार ही एक बस आहे.चुरनी पर्यंत दोन्ही बसेस नियमित येतात.परंतु चुरणी वरून पलसा,दहेंद्री,कोटमी हा मार्ग दहा किलोमीटर अंतराचा असल्याने चुरणी मार्गे कोटमी फाटा हे अंतर ३ किलोमीटर आहे.म्हणून सदर एस.टी.बस दररोज कोटमी मार्गे जाते.एक एसटी कोटमी फाटा शॉर्टकट मार्गाने जाते.या बसेसचा हा दररोजचा रूट असून दि.१८ जुलै २०२३ रोजी सकाळी दोन्ही गाड्या कोटमी फाटा मार्गे निघाल्या.चालक व वाहक यांच्यावर कोणाचाच दबाव नाही का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.की जे चालक वाहक म्हणतील तोच कायदा का? विद्यार्थी डोमा हायस्कूल ला ह्याच बसेसने जातात.जर बसेस शॉर्टकट मार्गे निघाल्या तर विद्यार्थी सुद्धा घरी परत येतात.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.विद्यार्थ्यांचे म्हणणे कोणी एकूण घेणार का?…असा प्रश्न पालकांसमवेत विद्यार्थ्यांसमोर उभा आहे.