दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-भूम तालूका पत्रकार संघाच्या वतीने मा.पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांची बदली निमीत्त त्यांचा सत्कार करण्यात आला. कर्तव्यदक्ष अधिकारी तथा सर्व सामान्य खाकी वर्दीतील देव माणूस असं त्यांची तालुक्यामध्ये ओळख निर्माण झाली होती. कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये त्यांनी अनाथ, विधवा ,वृद्ध ,गोरगरीब अशा लोकांना अन्नधान्य ची मदत केली. अशा महामारी पासून वाचण्यासाठी तालुकावाशियांची मदत घेऊन कोरोना या संकटावर मत मिळवली.त्यांनी धडकेबाज कामगिरी बजावली.एक तालुका एक गणपती असा हा अभिनव उपक्रम त्यांनी प्रथमच या तालुक्यात राबवला त्यांचा आदर्श संपूर्ण राज्याने घेतला.त्यांच्या अनेक सामाजिक कार्यामुळे ते तालुक्यातील नागरिकांचे आदर्श व्यक्तिमत्व ठरले. त्यांची बदली झाल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील जनसमुदाय असंख्य संख्येने आला होता.यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रमोद कांबळे, धाराशीव न्युज चे संपादक मा. अजीत बागडे, दैनिक पुढारी चे मा,तानाजी सुपेकर, दैनिक सकाळ चे मा. धनंजय शेटे, दैनिक लोकधारचे मा. रोहीत चंदनशिवे, दैनिक चालू वार्ता चे मा.नवनाथ यादव उपस्थित होते.
