दैनिक चालु वार्ता
म्हसळा रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात विकास होण्यासाठी मी माझा नोकरी व्यवसाय करून केवळ समाज हितासाठी भिक्षुकी अर्थात दानशूर व्यक्तींकडे आर्थिक मदत मागतो असे भावनोद्घार रायगड समाज भुषण पुरस्कर्ते,समाज सेवक कृष्णा महाडीक यांनी म्हसळा तालुक्यातील जिजामाता शिक्षण संस्था वरवठणे,आगरवाडा येथे इयत्ता आठवी ते दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याना दर्जेदार चप्पल(पादत्राणे)वाटप कार्यक्रमात जाहीरपणे व्यक्त केले.मिरा रोड निवासी दानशूर व्यक्तीमत्व,जेष्ठ समाजसेविका श्रीमती आशा भट्टाचार्य यांनी केलेल्या आर्थिक सहाय्याने रायगड भूषण पुरस्कर्ते समाज सेवक कृष्णा महाडीक यांच्या विशेष पुढाकाराने,शिक्षण संस्था प्रमुख माजी सभापती महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात शाळेच्या सर्वच विद्यार्थ्याना दर्जेदार चप्पल(पादत्राणे)वाटप कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला शाळा संचालक मंडळ सचिव अशोक काते,संचालक मनोज नाक्ती,उद्योगपती नवनीत पारेख,ॲड मुकेश पाटील,पांडुरंग पाटील,प्राचार्य संदिप कांबळेकर,सुतारसर, कांबळेसर,अंकुश गाणेकर,नितीन म्हस्के,लक्ष्मण गाणेकर आदी शिक्षकवृंद,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कृष्णा महाडीक यांच्या विशेष सहकार्याने जीजामाता संस्था शाळा इमारत जीर्णोद्धार,स्वच्छता गृह,दर्जेदार शैक्षणीक साहित्य भेट देवुन मोठे योगदान दिले आहे.दानशूर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या प्रेरणेतून समाजसेविका आशा भट्टाचार्य यांचेही आमच्या संस्थेस मोठे योगदान लाभले असल्याची माहिती महाडीक यांनी देताना त्यांचा आरोग्य सदृढ राहण्यासाठी आपण सर्वांनी ईश्वराकडे प्रार्थना करु या अशी इच्छा व्यक्त केली.गोर गरीब घटकाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो पण माय बाप जनतेने मोफत घेण्याची प्रवृत्ती सोडुन देत काबाड कष्ट करण्याची सवय,मानसिकता अंगी बाळगली पाहिजे त्यातुन प्रत्येकाचे आरोग्य सदृढ राहील आणि भविष्यातील पिढीला चांगली सवय लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली.संस्था प्रमुख महादेव पाटील यांची शैक्षिकदृष्ट्या असलेले उदिष्ट,जिद्द,चिकाटी आणि प्रेरणा वाखण्याजोगी आसुन या पुढेही हि संस्था माझी आहे असे समजुन सातत्याने सहकार्य केले जाईल.मराठी भाषे बरोबरच मुलांना अख्खलीत इंग्रजी भाषा अवगत होण्यासाठी आपले प्रयत्न असतील असे आश्वासन दिले.कार्यक्रमाला संचालक अशोक काते,नवनीत पारेख, संस्थापक अध्यक्ष महादेव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना माझ्या स्वप्नातील शाळा कशी घडली याचा वृत्तांत सांगितला. शाळेतील मुलांना चप्पल वाटप हा खऱ्या अर्थाने सर्वांना कौतुकाचा वाटत असला तरीही आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम राबविला जात असल्याचे महादेव पाटील यांनी माहिती देताना सांगीतले.कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत प्राचार्य संदीप कांबळेकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार सुतार सर यांनी मानले.
