
दैनिक चालु वार्ता
म्हसळा- रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६७ वी जयंती साजरी करण्यात आली.ग्रंथालयाचे चोखंदळ वाचक तथा बॅक ऑफ इंडियाचे प्रबंधक अश्विनी कुमार मेश्राम यांचे हस्ते लोकमान्य टिळक यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,अनिकेत जैन,ग्रंथपाल उदय करडे,लिपीक सायली चोगले उपस्थित होते.जयंती निमित्ताने वाचनालयात लोकमान्य ते महात्मा,शोध बाळ गोपाळांचा,लोकोत्तर लोकमान्य टिळक,टिळकपर्व,जागतिक किर्ती ची ५१ नररत्ने, उजेडाचे मानकरी,निवडक चरित्रे,लोकमान्य टिळक एक शोध आदी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते त्याचा अनेक वाचकांनी चांगला लाभ घेतला.