दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे..
पुणे/इंदापूर:लोणी निमगाव केतकी रोडला सकाळी आज अज्ञात वाहनाने एका हरणाचा बळी घेतला. लोणी – निमगाव केतकी येथील मार्गावरती फॉरेस्ट विभागाचे क्षेत्र आहे. त्या वन विभागात चिंकारा, हरीण या जातीचे इतर प्राणी भरपूर आहेत. लोणी निमगाव केतकी तसेच महामार्गाकडे जाणारा हा मधला रोड आहे .या रोडला वाहनांची वर्दळ भरपूर असते रोड लगतच वन विभागाचे क्षेत्र असल्यामुळे चिंकारा जातीच्या हरणांची संख्या जास्त आहे.आज दुर्दैवाने अज्ञात वाहनाने एका हरणाचा अपघात झाला व हरण ते जागीच ठार झाले हे माहिती ॲड. सचिन राऊत व वैभव जाधव यांना कळताच प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तेथील पाहणी केली असता वन खात्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असे तीव्र शब्दात वैभव जाधव व सचिन राऊत यांनी भावना व्यक्त केल्या.
कित्येक दिवस यांना वेळोवेळी पाठपुरावा करून वन खात्याच्या क्षेत्रात वन पक्षांची संख्या जास्त आहे असे बोर्ड लावले नाहीत वाहने सावकाश चालवा असे लावले नाहीत स्पीड बेकर नाहीत जर स्पीड बेकर असते तर हा अपघात झाला नसता अपघात झालेला हरणाला पीएम साठी बिजवडी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात अष्टविनायक रुग्णवाहिका यातून नेण्यात आले
वन खात्याने लवकरात लवकर वनक्षेत्राच्या विभागात येथे प्राण्यांची संख्या जास्त आहे वाहने सावकाश चालवा असे बोर्ड लावावेत अशी ही मागणी करण्यात आली यावेळी अपघात झालेल्या हरणाचे पीएम झाल्यानंतर त्या हरणाला वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यातआले
नेचर फ्रेंड्स क्लबचे एडवोकेट सचिन राऊत, वैभव जाधव, किरण लोणकर ,विकी हुंबरे , गणेश घाडगे तसेच समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
