दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे..
जालना मंठा..तालुक्यातील माळेगाव येथील रहिवासी डॉ. अक्षय ज्ञानदेव चव्हाण यांनी मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तालुक्यातून प्रथम रेस्पायरेटरी मेडिसिन या विषया मध्ये एम.डी.होण्याचा मान मिळवला आहे.बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी मंठा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात मराठी माध्यमातून पूर्ण केले शिक्षकांचे तसेच त्यांचे आतेभाऊ विजय राठोड सर.वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची आवड त्यांना सुरुवातीपासूनच होती त्यासाठी त्यांनी प्रचंड अभ्यास करून धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. तेथे त्यांनी एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी एम डी चे शिक्षण रेस्पायरेटरी मेडिसिन या विषयात मुंबई येथील नामांकित जे जे रुग्णालय येथून पूर्ण केले. या उत्तुंग यशासाठी डॉ.चव्हाण यांच्यावर सर्व नातेवाईक,मित्रमंडळी तसेच मार्गदर्शक यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी त्यांचा सत्कार करताना मा. नगराधक्ष कैलास बोराडे,शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे,उपतालुकाप्रमुख गजानन कापसे,युवासेना उपतालुकाप्रमुख लिंबाजी बोराडे, विजय राठोड सर,मोहन बोराडे व इतर सहकारी…
