
दैनिक चालू वार्ता
अहमदपूर प्रतिनिधी विष्णू मोहन पोले
अहमदपूर :-तालुक्यातील मौ.गंगाहिप्परगा ते अहमदपुर, बेंबडेवाडी, सुमठाणा बंद पडलेली बस सेवा सुरु करा असी मागणी गंगाहिप्परगा येथील सरपंच,सौ.मिनाताई लक्ष्मण कोमले व उपसरपंच नागेश बेंबडे आणि गावातील, शाळेतील विद्यार्थी, जेष्ठानी,महिलांनी व नागरिकांनी केली आहे सरपंच यांनी सांगितले की अहमदपूर ते गंगाहिप्परगा बस सेवा मागच्या दहा वर्षांपासून चालू आहे परंतु मागच्या चार महिन्यापासून सुमठाणा या गावातूनच परत येत आहे ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करून सुद्धा बस गंगाहिप्परगा या गावाला जात नाही त्यामुळे बेंबडेवाडी व गंगाहिप्परगा गावच्या नागरिकांनी व विद्यार्थी ,शाळा, कॉलेजमधील जाणारे विद्यार्थी यांना देखील बसची सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच सदरील गावातील वयोवृद्ध ग्रामस्थांना बस पासून वंचित राहावे लागत आहे त्यांना पण बसचा लाभ मिळत नाही तसेच ज्या लोकांकडे मोटरसायकल किंवा गाड्या आहेत ते लोक अहमदपूरला येतात आणि जे गोरगरीब लोक आहेत त्यांना अहमदपूर ला येण्यासाठी खूप त्रास होत आहे त्यामुळे अहमदपूर आगार प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर,तहसीलदार कार्यालय अहमदपूर या सर्वांना विनंती केली आहे की निवेदणाद्वारे व कळविण्यात आले आहे तसेच निवेदन देते वेळेस गावातील ग्रामसेवक मोहन केंद्रे, सरपंच ,मिनाताई कोमले,उपसरपंच, नागेश बेंबडे,ग्रामपंचायत सदस्य, अरुण कदम ,अनंत फाजगे, विश्वनाथ भालेराव, शिवाजी चामवाड, ग्रा.आॅरेटर त्रिभवन काडवदे,ग्रा. सेवक गुलाब शेख,विविध सोसायटीचे सदस्य लक्ष्मण कोमले, संतोष कदम,प्रताप फाजगे,विजय काडवदे, मोरेवाड मामा या सर्वांनी विनंती केली आहे तसेच ग्रामपंचायत च्या वतीने अहमदपूर ते गंगाहिप्परगा बस सेवा सुरळीत चालू करावी असे आव्हान गंगाहिप्परगा येथील सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी केली आहे…