
दैनिक चालू वार्ता उप संपादक
भूम:-भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्यांना खूप संधी आहेत, मी सातत्याने पक्षाचे आदेश पाळत राहून काम करत राहिलो म्हणून पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे . मिळालेल्या संधीचा उपयोग प्रत्येक कार्यकर्त्याच्या समस्या सोडवण्याबरोबरच पक्ष वाढीसाठी जिद्दीने काम करेल असा विश्वास नूतन जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी भूम येथे सत्कार स्वीकारताना दिला..सोमवार दि. 24 जुलै 2023 रोजी भारतीय जनता पार्टी तालुक्याच्यावतीने नूतन धाराशिव भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी (काका) चालुक्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची अडचणी सोडवण्यासाठी व पक्ष बळकट करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी यांच्या पाठीमागे सक्षम उभे राहून आगामी काळात कार्यकर्त्यांची अडचण ही माझी अडचण समजून त्याचे निवारण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.आगामी काळात होणाऱ्या सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्यात एक नंबरची पार्टी म्हणून उदयास आणण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गटातटाचे राजकारण न करता सबका साथ सबका विकास आणि और सबका विकास हे ब्रीद वाक्य घेऊन निघालेले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आ. सुजितसिंह ठाकूर , आ . राणा दादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एक दिलाने काम करण्याचे आव्हान केले.याप्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे, व्यंकटराव गुंड, युवराजजी नळे, सतीश देशमुख, रामदास कोळगे, गुलचंद व्यवहारे , भाजप युवा नेते इंद्रजित देवकते, उद्योग आघाडी जिल्हा संयोजक प्रवीण पाठक, जालिंदर मोहिते, भाजप जेष्ठनेते
बाळासाहेब क्षिरसागर , जिल्हा सरचिटणीस आदम शेख, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, सरचिटणीस संतोष सुपेकर, ता. उपाध्यक्ष बाबा वीर, शहर अध्यक्ष शंकर खामकर, सरचिटणीस हेमंत देशमुख , अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष महेबूब शेख उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष बापू बगाडे, महिला तालुकाध्यक्ष लताबाई गोरे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष प्रदीप साठे व तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक महादेव वाडेकर यांनी केले सूत्रसंचालन शंकर खामकर यांनी केले तर आभार आदम शेख यांनी मानले.