
दै.चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
मारतळा :- लोहा तालुक्यातील भाजपाला धक्का, मारतळा येथील सरपंच श्री. बालाजी बिचेवाड यांची भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षामध्ये माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते आदरणीय श्री. अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला. तसेच दि.२७ रोज गुरूवारी सकाळी १०:०० वाजता माजी मुख्यमंत्री श्री. अशोकराव चव्हाण साहेब मारतळा येथे उपस्थित राहणार आहेत. परीसरातील नागरिक व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे. साहेब पूरग्रस्त भागातील देगलूर, बिलोली येथे भेट देण्यासाठी जाणार आहेत. तेव्हा साहेबांनी मारतळा येथे थोडा वेळ दिला आहे. सरपंच बिचेवाड यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी माहिती दिली. यावेळी उपस्थित लोहा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पाटील पवार, सेवा दलाचे अध्यक्ष श्री.उध्वव पाटील मारतळेकर, उपाध्यक्ष श्री. किशनराव पाटील लोंढे, श्री. उत्तमराव पाटील वडवळे, सहकोषाध्यक्ष श्री. विनायकराव पाटील हंबर्डे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अकबर मौलाना, तालुका सरचिटणीस श्री. मारोती पाटील श्रीरामे, कंधार तालुका उपाध्यक्ष श्री. नागोराव पाटील मोरे, पत्रकार डी. एन. कांबळे, सेवानिवृत्त सैनिक श्री. व्यंकटराव घोडके यांची उपस्थिती होती.