
दै.चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- मराठी पत्रकार परिषदेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या चारचाकी वाहनाला सोमवारी रात्री अकराच्या सुमारास बीड जवळ अपघात झाला.या अपघातात गोवर्धन बियाणी व त्यांची आई,मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत.माञ वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघात झाल्याचे कळताच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी बीडच्या पत्रकारांना घटनास्थळी रवाना केले.
सोमवारी सायंकाळी कामकाज आटोपून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, त्यांची आई व मुलगा एका चारचाकी वाहनाने बीड कडे निघाले होते. दरम्यान रस्त्यावरील गतिरोधकामुळे बियाणी यांच्या वाहनासमोरील चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बियाणी यांचे वाहन समोरील वाहनावर धडकले. या अपघातात गोवर्धन बियाणी यांचे वाहनचालक किरकोळ जखमी झाला. मात्र गोवर्धन बियाणी त्यांची आई व मुलगा यांना इजा झाली नाही. अपघातानंतर चार चाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगार्यात जाऊन फसले होते. दैव बलवत्तर होते म्हणून बियाणी आणि त्यांच्या परिवाराला धक्का लागला नाही. अपघाताची बातमी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांना समजताच बीड येथील पत्रकारांना घटनास्थळी रवाना केले.
डिजीटल मीडियाचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, रवी उबाळे, विशाल सोळंके यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली तर मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी भ्रमणध्वनी वरून गोवर्धन बियाणी यांच्याशी संपर्क साधला.
नांदेड जिल्ह्यातही अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी फोनवरून श्री गोवर्धन बियाणी यांच्या तब्येतीची विचारपूस केली तर रात्रीच गोवर्धन बियाणी यांचे मित्र घटनास्थळी रवाना झाले होते.