
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा तालुक्यातील देवगाव ( खु. ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शौचालयाचे संरक्षक भिंत खचून अंगावर पडल्याने दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली. सर्व जखमींवर परंड्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते . यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी पाहणी करून त्यांची विचारपूस केली.त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या अपघातामध्ये विद्यार्थिनी महेक अल्लाउद्दिन तांबोळी (१३ वर्षे, वर्ग ७ वा), अनुष्का शंकर शिंदे (११ वर्षे, वर्ग ५ वा) अशी जखमीं विद्यार्थीनीची नावे आहेत. दोन दिवसांपासून सततधार पाऊस सुरू आहे
बुधवारी सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्याने विद्यार्थिनी स्वच्छता ग्रहाकडे गेल्या असता भिंतीचा काही अचानक कोसळला गेला. या घटनेमध्ये दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या.
जखमी झालेल्या विद्यार्थीनींना तात्काळ परांडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.विद्यार्थिनींच्या हाताला मार लागला असल्याने सीटी स्कॅन करण्यात आले. दोन्ही जखमी विद्यार्थीनीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तसेच घटनेची माहिती मिळताच शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित पाटील, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, प्रशांत गायकवाड, नागेश नरसाळे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थीनी यांच्या आरोग्य विषची चौकशी केली
परंडा तालुक्यातील अनेक शाळा इमारती जीर्ण झाल्या आहेत. पावसामुळे अशा इमारती धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे शिक्षण विभागाने व्यापक तपासणी मोहीम राबवून यावर उपाययोजना करावी. अशी मागणी होऊ लागली आहे.