
दैनिक चालु वार्ता
अमोल आळंजकर
गंगापूर (प्रतिनिधी)हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये बेकायदेशीर व मनमानी कारभाराची सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधीताविरुध्द कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करताच आपला दवाखाना गंगापूर शहरातील म्हाडा कॉलनीत स्थलांतरित करण्यात आला अतुल रासकर यांच्या मागणीला यश
रासकर यांनी जिल्हाधिकारी व आमदार प्रशांत बंब व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देवून तक्रार दिली होती की”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” १ मे २०२३ रोजी स्थापन करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत तालुक्यातील झोपडपट्टी व शहरापासुन / गावापासुन दुर राहणाऱ्या नागरीकांसाठी ही योजना सुरु केलेली आहे. परंतु गंगापुर शहरात सदरील योजना ही पंचायत समिती परिसरातील अत्यंत निकृष्ठ दर्जाच्या व मोडकळीस आलेल्या खोलीमध्ये आपला दवाखाना सुरु आहे. आपला दवाखाना हा मोक्याचे ठिकाणी असणे गरजेचे असतांना नगर परिषद गंगापुर चे मुख्याधिकारी यांनी वरील दवाखान्याबाबत स्वतः प्रत्यक्ष हजर राहुन आवश्यक असलेल्या ठिकाणी न करता हलगर्जीपणाने अत्यंत बिकट व स्वच्छता नसलेल्या परिसरात १ मे पासुन दवाखाना सुरु केला आहे. या दवाखान्याबाबत गरजुंना व वंचीतांना कोणतीही माहिती नसल्याने सदरील गरजू रुग्न हे त्या सेवेपासुन व लाभापासुन वंचीत राहत आहे. आज रोजी या दवाखान्याबाबत कोठेही सुचना फलक अथवा बॅनर अथवा इतर पध्द खीळतीने दवाखान्याचा प्रचार प्रसार करण्यात आलेला नाही. दवाखान्यातील कर्मचारी व विशेष करुन मुख्याधिकारी, नगर परिषद गंगापुर हे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजनेच्या लाभापासुन वंचीताना दुर ठेवत आहे व शासनाने दिलेल्या सेवेचा लाभ गरजू रुग्नांपर्यंत पोहचु देत नाही. आजमितीला दवाखाना ठरलेल्या वेळेनुसार व नियोजनानुसार सुरु नसुन मनमानी कारभारानुसार सुरु असल्याची तक्रार केली होती या तक्रारीची आमदार प्रशांत बंब व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दखल घेत हा आपला दवाखाना म्हाडा कॉलनी येथे स्थलांतरित करून सुरू केला आहे परंतु सध्या या दवाखान्यात बि ए एम एस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत या दवाखान्यात एम बि बि एस डॉक्टरांची त्वरित भरती करावी अशी मागणी अतुल रासकर यांनी केली आहे.