
दै.चालु वार्ता
उस्माननगर (प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- लॉयन्स क्लब मिडटाउन नांदेड च्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी दि. २९ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी लॉयन्स क्लब मिडटाउन नांदेड चे अध्यक्ष अमरसिंह चौहान, सचिव नितीन लाठकर, कोषाध्यक्ष शिवाजी ईबितवार, छायाचित्रकार विजय होकर्णै, यांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार देवून सत्कार केला.
यावेळी होकर्णै यांनी पत्रकार सभागृहाचे कौतुक करून पत्रकार संघाच्या कार्याची विशेष नोंद घेतली.लॉयन्स क्लब मिडटाउन नांदेड ने उस्माननगर येथे लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे असे सांगितले.
यावेळी सुनील देशपांडे, माधुरी देशपांडे, संगीता लाठकर, सुनिता चौहान, आर, के, पाटील, विजय होकर्णे, शिरिष गिते, रमेश मिरजकर, अशोक कासलिवार, किशोर पाटणी, बालाजी काळम, गोविंद घोरबांड, गणेश शिंदे, गोविंद काळम, व्यंकट काळम, शशिकांत भिसे,शाश्वत लोखंडे, परिक्षित लोखंडे, शिलगिरे, आदींची उपस्थिती होती…