
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: हल्ली देगलूर शहरामध्ये सर्वत्र खासगी क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे. एकीकडे शाळांचे अवाजवी शुल्क, तर दुसरीकडे कोचिंग क्लासेसच्या गगनाला भिडलेली फी… यात सामान्य पालकांचे बजेट पूर्णत: कोलमडले जात आहे.
दर्जेदार सोयीसुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षक असलेल्या खासगी इंग्रजी शाळांमध्ये पाल्य शिक्षण घेत असूनही, पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी कोचिंग क्लासेसचा आसरा का घ्यावा लागतो? मग गुणवत्ता नक्की कोण देतंय शाळा की क्लासेस? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासह खासगी क्लासेसवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न व्हावा, अशी मागणी होत आहे.देगलूर शहरातील
गल्लीबोळात आणि ग्रामीण भागातही क्लासेसची संस्कृत बळावली आहे. त्यामुळे शिक्षण हा एकप्रकारे गोरखधंदाच झाला आहे. विशेष बाब म्हणजे, खासगी क्लासेसला शासन ‘आधार’ देऊ पाहत असल्याने एकंदर दर्जेदार शिक्षण घेणे ही श्रीमंतांचीच बाब झाली आहे का? हा प्रश्नही पालकांना विचार करण्यास भाग पाडत आहे.शाळांप्रमाणेच क्लासेसच्या शुल्कावर कोणतेही नियंत्रण नाही. क्लासेस म्हणेल ती रक्कम पालक देण्यास तयार होतात. ही खासगी क्लासेसद्वारे होणारी पिळवणूक रोखण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा आणणार होते, त्याचं पुढे काय झाले? हे मात्र शासनालाच माहीत पण कुठेतरी सामान्य नागरिकांच्या पाल्याला या सुविधेपासून दूर राहण्यास भाग शासन पाडत आहे का? अशा या खाजगी क्लासेसच्या गोरखधंदावर शासनाने वेळीच पायबंदी घातली पाहिजे….