
सहा हजार रुपयांत एक ब्रास वाळू वाळू माफियांची चांदीच चांदी…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहरात तेलंगाना राज्याची वाळू बिनधास्त वाळू माफिया खुल्या बाजारात सहा हजार रुपयाला एक ब्रास वाळू विक्री करत असताना दिसून येत आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाने सहाशे रुपयांत एक ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचे स्वप्न जनतेला दाखवीले देगलूर तालुक्यातील शेवाळा येथे २२ मे रोजी शासकीय डेपोची उभारणी केली. पण चोवीस तासामध्येच ऑनलाईन वाळू संपली व काही विशिष्ट लोकांनीच ऑनलाईन करून ५० ते ७० ब्रास वाळू स्वतः ऑनलाइन करून घेतली पण प्रशासनाने ज्यांनी वाळू बुक केली खरंच त्यांच्याकडे बांधकाम परवाना आहे का ? हे मात्र बघितले नाही याचाच फायदा घेऊन या विशिष्ट लोकांनी स्वतःच्या व आपल्या संबंधिताच्या आधार कार्डवर५० ते ७०ब्रास वाळू गोळा केली मात्र घरकुल धारकांना व सामान्य नागरिकांना एक ब्रास वाळू पन मिळाली नाही शासनाच्या या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात वाजा गाजा करून शुभारंभ करण्यात आला होता पण या योजनेचा तालुक्यातफज्जा उडाला आहे. तर दुसरीकडे वाळू माफियांचे ‘अच्छे दिन’ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याचा फायदा घेत तेलंगानातील वाळू बिनधास्त आरटीओ चेक पोस्ट व वजन काट्या समोरून देगलूर शहरात तेलंगणाची वाळू आणत असून खुल्या बाजारात सहा हजार रुपयांत एक ब्रास वाळू विक्री करीत असल्याने
वाळू माफियांचा धुमाकूळ माजला आहे तेलंगानातील वाळू भक्तापूर नागराळ या मार्गे शहरात येत असून. प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेत असताना दिसत आहे. जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांच्या नजरेस पडत नसावी का? उपअधीक्षक सूरज जगताप यांनी असा सवाल उपस्थित करीत पोलिस यात जातीने लक्ष दिले पाहिजे देगलूर मधील काही राजकीय नेत्याच्या आशीर्वादामुळे हा सावळा गोंधळ सुरळीत सुरू असल्याची चर्चा या परिसरात होत आहे. याप्रकरणी देगलूरचे सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व पोलीस निरीक्षक संजय हिबारे पोलिस उपअधीक्षक सूरज जगताप यांनी जातीने लक्ष देऊन या तेलंगानातून वाळू आणणाऱ्या वाळू माफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी देगलूर व देगलूर परिसरातील नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.