
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी उमापूर कृष्णा जाधव
गेवराई उमापूर उमापूर पांचाळेश्वर रस्ता आता बेशरम लावण्या योग्य झाले असून,लवकरात लवकर या बेशरम लागवड करण्यात यावी,असे निवेदन येथील जनतेतून देण्यात येणार आहे.
उमापूर पांचाळेश्वर रस्ता हा पूर्णपणे खांदून गेला असून,या रस्त्यावर तळ्याचे स्वरूप आले असून,
केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी येऊनही
आजही उमापूरचा विकास 30ते35 वर्षापासून नाहीच,असे येते
आमदार पवारांनी हे गाव दत्तक घेतलेले असून या गावाचा विकास फक्त पाण्यावरती तरंगत दिसत असून,याकडे डोळे झाकून बसलेले राजकारणी यांना जनतेची किव कधी येणार,येथे रस्ताच नाही तर रस्त्याच्या साईटच्या नाल्या कशा येणार.
आमदार पवार साहेब कार्यकर्त्यांनी रस्ताच गायब केला,असे येथील पीडित नागरिकांचे म्हणणे आहे.
ऊमापुर येथील कोणत्याही वस्ती, गल्ली,दलित वस्त्या, तांडे,यांचा आज देखील विकास झालेला नाही.
मग बजेट गायब कसे होतात,
कचऱ्या टाकण्यासाठी असलेल्या कचराकुंडीही गावात नाही व त्यामुळे फक्त चौकडे गावात कुठेही कचराच कचरा त्यामुळे पाणी वाहण्यासाठी नाल्या नसल्याने,नागरिकांना रस्त्याने चालणे ही कठीण झाले असून,उमापूरचे नागरिक संतप्त झाले आहे. ठिकठिकाणी ऊखरड्याचे स्वरूप आले असून,
या उखड्यांमध्ये विकास दबून गेला.
ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य माजू लागले,मोठमोठ्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले,नागरिकांना चक्क गिरणीचे पीठ ही आणण्यासाठी पाण्यात पोहून जावे लागतात,
संडास बाथरूम तर नाहीच, पावसात महिलांना व नागरिकांना नहतत्रास सहन करावावा लागतो,गावाचे राजकारण पंडित-पवारांनी वाटोळे केले,येथे एकही विकास कामे झालीच नाही असे जनतेकडून सांगण्यात येते,
गेले कित्येक वर्षापासून आज हे गाव विकासापासून वंचितच आहे,
ठिकठिकाणी घाण व पाण्याचे डपके साचलेले असून,त्यात दुर्गंधी पसरून डासांची उत्पत्ती होते,व सामान्य आरोग्यास याचा खूप मोठा परिणाम होतो व रोग राही पसरते,व सर्व सामान्य जनतेला मलेरिया, डेंगू,चिकनगुनिया,अशा मोठ्या आजारांना सामोर्य जावे लागते,
यांचा कधी पवार साहेबांनी आढावा घेतला नाही का.?
कारण साहेब तुमचं हे राजकारण जनतेच्या जीवावर बेतायला वेळ लागत नाही
खेडेगावातील दलितांची आर्थिक स्थिती देश स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष होऊन गेली,तरीही सुधारली नाही,
कारण कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांनी दत्तक घेतलेलं उमापूर हे गाव
आज ही विकासापासून वंचितच आहे.गावाची अशी दुर्दशा झाली असून,आता याकडे तुमची लक्ष देण्याची गरज आहे की,मागील चार वर्षे पूर्वी कार्यसम्राट लक्ष्मण आण्णा पवार यांनी विकास कामासाठी उमापूर गाव दत्तक घेतल्याची घोषणा
जाहीर सभेत घेतली असून,उमापूर पांचाळेश्वर,भवानीनगर तांडा,दत्तनगर,भीम नगर,साठे नगर,
व गणेश नगर,यांना जाणून बुजून
विकासापासून वंचित ठेवले जाते,
गाव गाड्यांच्या पुढार्यामुळे होत नसलेली कामे,आमदार पवारांनी यात हस्तक्षेप करून मार्गी लावावी अशी अपेक्षा गावकऱ्यांकडून होत आहे.
गावाच्या आतील पुढार्यांच्या गल्ल्या गल्ल्यांतील रस्ते एकदम भारी केले गेले,मात्र आतील वस्त्यांचे रस्ते आणि नगरांचे वस्ती, रस्ते आजही आजुन 30 ते 35 वर्षापासून असेच पडून आहे,याला कारणीभूत कोण आहे याकडे पवार साहेबांनी लक्ष देणे गरजेचे आहे,
एखादे काम केलेच तर ते एकदम निष्कृष्ट दर्जाचे केले गेले असुन तरी
या वस्त्यांतून चालणे कठीण झाले आहे.
घनकचऱ्याची वाहतूक करण्यासाठी *उमापूर ग्रामपंचायत ने आठ घंटा गाड्या कागदोपत्री खरेदी केल्या परंतु त्या घंटा गाड्या बाहेर निघाल्या त्या वापसच आल्या नाही की काय.* मग त्या गेल्या कुठे..?आमदार साहेब गावात कोणालाच काहीच कळेना की हे चाललय काय..?या गाड्या रस्त्यावर चालण्या आधीच खराब झाल्या.
दुरुस्ती करण्याच्या नावाने याचे बिल ही उचलले गेले असा भयान प्रकार
येथील ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत,व इतर संबंधित अधिकारी यांनी केला असून,
यांची आता चौकशी होण्याची ही मागणी गावागावातुन जोर धरू लागली आहे.
वंचित बहुजन आघाडी प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर हवाले यांनी चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी
नसता आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला.कार्यसम्राट
लक्ष्मण आण्णा पवार आता या गोष्टीची विचारणा करतील का
असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित होतो…