
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: नांदेड जिल्ह्यातील उपजिल्हा म्हणून समजला जाणारा देगलूर तालुका तीन राज्याच्या सिमेवर वसलेला एक शहर. देगलूर बस स्थानकातून कर्नाटक व तेलंगाना राजाला जाणारे हजारो प्रवासी या बस स्थानकामधून ये जा करतात त्याच बस स्थानकामध्ये डुकरांचा सुळसुळाट माजलेला आहे त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे पण प्रशासनाचे मात्र सरळ सरळ दुर्लक्ष होताना दिसत आहे .देगलूर शहर हे अडत,शिक्षण ,आरोग्य , न्यायव्यवस्था,विविध प्रकारची बाजारपेढ सर्वगुण संपन्न असून या ठिकाणी हजारोच्या संख्येने प्रवाशी ये जा करीत असतात, परंतू देगलूर येथील बसस्थानक परिसरात नागरिकांचा सहवास नसून डुकरांचा सहवास जास्त प्रमाणात असल्यामुळे हे बसस्थानक नागरिकांसाठी आहे का डुकरांसाठी आहे असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
देगलूर येथे दोन बस स्थानक असून नविन बसस्थानक व जुना बसस्थानक अशा नावाने ओळखले जाते.देगलूर शहरातील मध्यभागी असलेल्या जुन्या बसस्थानकाच्या बांधकामासाठी किमान दोन ते तीन वर्षापासून वाट पाहावी लागत असून आजतागायत त्या बांधकामाला मुहुर्तच मिळत नाही व याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे व प्रवाशांचे जीव धोक्यात आले असून या प्रकाराकडे न लोकप्रतिनिधीचे लक्ष आहे न आगार व्यवस्थापकाचे आहे.
सध्याची परिस्थिती पाहता देगलूर येथील दोन्ही बसस्थानकाची अवस्था अशीच झाली असून प्रशासन व लोकप्रतिनिधी या प्रकाराकडे का कानाडोळा करीत आहेत याची कुणालाच कळत नसल्याचे सांगितले जाते.परंतू या प्रकाराकडे का गांभिर्य लक्षात घेतले जात नाही व प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा पकड नसल्याचे दिसून येत नसल्याची चर्चा सर्वदुर पसरली आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रवाश्यांना होणार्या गैरसोय बद्दल लक्ष घालून देगलूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांना योग्य सुविधा कशा दिल्या जातील याकडे लक्ष घातले पाहिजे येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये जनतेने या भ्रष्ट राजकारणीयांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही…