
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-भू म येथील महिला व बालविकास कार्यालयाच्या वतिने महिला व बाल सशक्तीकरण योजनेतंर्गत तालुकास्तरीय महिला व बालकाशी संबंधित कायदे व योजनेची जाणीव जागृती कार्यशाळा उत्सहात संपन्न झाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या वतीने यश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला व बालकाशी संबंधित कायदे व जाणीव जागृती कार्यशाळेत बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम, लैंगीक संरक्षणापासून बालकांचे सरंक्षण अधिनियम, ग्राम बाल संरक्षण समिती, महिला व बालकांच्या विविध योजना या विषयावर बालकांचे हक्क अबाधित राखून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालणा देणे, बालकांच्या समस्यांची सोडवणूक करणे, बालकांचे विविध योजनांची समन्वय साधणे, गावपातळीवरील बालकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या हेतूने महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त बाल संरक्षण कक्षाच्या वतीने ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व बालक यांचा समावेश आहे. त्यांना बालकांचे हक्क समितीचे कार्य व जबाबदा-याबाबत या कार्यशाळेत बाल कल्याण समिती अध्यक्ष विजयकुमार माने यांनी मार्गदर्शन केले. तसेच दयानंद काळुंखे यांनी गीतांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत जिल्हाअध्यक्ष बाल कल्याण समिती विजयकुमार माने, सदस्य दयानंद काळुंखे, पर्यविक्षा अधिकारी व्यकंट देवकर, पढरीनाथ घोडके, सरंक्षण अधिकारी दिनेश घुगे, समुपदेशक पुजा सौदागर, पर्यविक्षाका इंदू महाले,एस.एन.हुंबे हे उपस्थित होते.या कार्यशाळेत उपस्थितांनी बालविवाह व हुंडाबंदीची शपथ घेतली…