
दैनिक चालु वार्ता
ग्रामीण प्रतिनिधी माणिक सुर्यवंशी..
खानापूरच्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत पाटील व ताडकोले गटाचे वर्चस्व
देगलूर तालुक्यातील सर्वात मोठ्या सोसायटी पैकी एक खानापूरची सेवा सहकारी सोसायटी होय या सोसायटीवर आनंद पाटील यांच्या गटाचा शेतकरी विकास पॅनल दणदणीत विजय झाला असून 13 पैकी 13 जागा बहुमताने निवडून आले आहेत
1. अनंत हनमंतराव पाटील
2. भगवानराव शंकरराव आटकळे
3. ज्ञानेश्वर मल्लप्पा ठिगळे
4. भाऊराव सोनबा तुरुकवाड
5. रंजीत विठ्ठलराव घरडे
6. संभाजी हनुमंतराव माराज्वाडे
7. सो गोदावरी नागनाथराव कामशेट्टी
8. बळवंत नागनाथ पटने
9. चंद्रकला रमाकांत परबते
10सुभद्राबाई तुकाराम केरले
11पुंडलिक खंडोबा खानापूरकर
12 सूर्यकांत मल्लू यनल वार
13 चांदू मरीबा बिजलीकर
आधी उमेदवार भरघोस मताने निवडून आले या निवडणुकीत आनंद पाटील गटात माजी उपसरपंच राजेश्वर अटकळे, शिवकुमार ताडकोले, उपसरपंच राजेंद्र इंगळे, अविनाश पाटील, विश्वनाथ ताडकोले शंकरराव वाघमारे पंडित वाघमारे, सरपंच गौतम वाघमारे, भीमराव यांनलवार, रवींद्र कामशेट्टी, नागेश्वर बक्कनवार, जयदेव केरले मंजुनाथ पर्वते, राम यन लवार, मुन्ना पाटील, शेषराव घरडे, बालाजी तुरुकवाड , पंढरी पांचाळ,सय्यद अफसर, आदी गावातील प्रमुख लोक होते यांनी विरोधी पक्षप्रमुख असलेले भगवानराव विभुते व अच्युत कदम यांच्या गटाचा दारुण पराभव केला या विजयाचा आनंद उत्सव गावात मिरवणूक काढून सर्व सभासदांना भेटून करण्यात आला…