
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :भाजपाच्या वतीने दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्रात मतदार यादी निरीक्षण व नवं मतदार नोंदणी अभियान संदर्भातील शहर व ग्रामीण मंडळाची बैठक अंजनगाव सुर्जी येथील शासकीय विश्रामगृह येथे दि.३१ जुलै २०२३ रोजी पार पडली.
या पार पडलेल्या बैठकीत कार्यकारिणी गठित करण्यात आली असून १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करता येईल.याकरिता भाजपा कडून संबंधित कार्यकारिणी यावेळी गठित करण्यात आली व प्रत्येक प्रभागात प्रभाग प्रमुख नियुक्त केले असे नवं मतदार अभियान संयोजक श्री.दत्तात्रेय पाटील यांनी म्हटले.
या नव मतदार नोंदणी नियोजन बैठक व त्यासंबंधित कार्यकारिणी गठित करण्यादरम्यान दर्यापूर-अंजनगाव सुर्जी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रमेश बुंदीले,जिल्हा संयोजक दत्तात्रेय पाटील,विवेक गुल्हाने,नितीन गुढधे,सौ.संगीताताई शिंदे,दर्यापूर मतदारसंघ निवडणूक प्रभारी गोपाल चंदन,माजी नगराध्यक्ष कमालकांत लाडोळे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रियंकाताई मालठाने,भाजयूमो जिल्हाध्यक्ष मनीष मेन,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलासजी कविटकर,जिल्हा सचिव ॲड.पद्माकर सांगोळे आदी पदाधिकारी,तालुका व शहर अध्यक्ष,मंडळ अध्यक्ष तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.