
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – सोमजाईमाता क्रीडा मंडळ खरसई यांच्या माध्यमातून शिक्षणासारख्या पवित्र आणि विधायक कार्यासाठी सतत पुढे राहून कार्य करणाऱ्या मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक शाळेत शिकणाऱ्या विदयार्थ्यांना शालेय साहित्य पुरवत असतात. जिजामाता मराठी माध्यमिक शाळा वरवठने – आगरवाडा येथे हि सोमजाईमाता क्रीडा मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापक मा महादेव पाटील मा सभापती संचालक श्री दिलीप कांबळे, सोमजाईमाता क्रीडा मंडळ चे संस्थापक मा. चंद्रकांत खोत, श्री नथुराम खोत, शाळेचे मुख्याद्यापक संदीप कांबळेकर, शिक्षक कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार नितीन म्हस्के यांनी केले.