
दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे
काल दिनांक: 01/08/2023 रोजी जि. प. प्रा .शा. पिंपरणवाडी येथे शेवडी बा. या केंद्राची माहे : जुलै 2023 या महिन्याची शिक्षण परिषद पिंपरणवाडी या शाळेने आयोजित केली होती. प्रस्तुत शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्री नागोराव जाधव केंद्रप्रमुख शेवडी बा. हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती .आंबलवाड मॅडम ( शि. वि . अ. बीट सुनेगाव प्र. ग. शि. अ.) , श्री .आनंदा नरवाडे (केंद्रीय मु. अ. शेवडी, बा . ), श्री. कालेवार सर (मु .अ. जि. प .हा. पेनुर), श्री . मरशिवणे सर ( मु. अ. महेश विद्यालय शेवडी), श्री अशोक राऊत सर ( मुख्याध्यापक प्रा शा दगडगाव ), श्री विजय राणे सर मुख्याध्यापक प्रा. शा. बेटसांगवी श्री केशव पाटील जाधव शा. व्य. स. अध्यक्ष आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.
कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. मोरे डी. यु. सर ( मु. अ. पिंपरणवाडी ) यांनी कार्यक्रमाचा उद्देश व आयोजन रूपरेषा सांगितली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच केंद्र शेवडी बाजीराव येथून बदलीने गेलेले शिक्षक / शिक्षिका यांना केंद्रातर्फे निरोप देण्यात आला. यात श्री काळेवाड सर, श्री कोडगिरे सर, सौ. बोधनकर मॅडम, श्री लामदाडे सर, सौ नागमपल्ले मॅडम, श्री रासवदे सर यांचा समावेश होता. शेवडी केंद्रात बदलून आलेले शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. यानंतर सेतू अभ्यासक्रम या विषयावर सौ कदम एस बी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्यानंतर आपल्या अभ्यासपूर्व वक्तव्यामध्ये श्री कुलकर्णी यु .डी. यांनी अध्ययन स्तर निश्चिती व व्हिस्कुल ॲप यावर सखोल मार्गदर्शन केले. विद्या प्रवेश या विषयावर श्री कैलासे सर यांनी सर्वांना मार्गदर्शनपर अध्यापन केले. तदनंतर श्री कलने सर यांनी बदललेले क्रमिक पाठ्यपुस्तक यावरील राबवायचे उपक्रम व माझी नोंद कशी करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
श्रीमती आंबलवाड मॅडम यांनी शिक्षकांना भवितव्यासाठी करावयाची कार्यवाही याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपामध्ये श्री नागोराव जाधव यांनी सर्व विषयांचा आढावा घेत सर्व शिक्षकांना प्रशासकीय सूचना दिल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी देश स्वातंत्र्यासाठी केलेले योगदान याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री बसवदे सर यांनी केले . तर आभार प्रदर्शन श्री सोनकांबळे सर यांनी केले. सुरुची भोजनांची व्यवस्था पिंपरणवाडी या शाळेच्या मु. अ. व शिक्षकांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.