
लोहा तालुक्यातील भावीक भक्तांनी लाभ घ्यावा…
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा : – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र ञ्यंबकेश्वदशर ,जा नाशिक सद्गुरू प.पुज्य मोरेदादा चॅरिटेबल हाॅस्पीटल ॲड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व गुरूमाऊली प पुज्य आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशानुसार श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित कै लक्ष्मणराव बिडवई नगर लोहा येथे दिनांक १२ऑगस्ट २०२३ शनिवार रोजी मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण शिबीर होणार असून तरी लोहा शहरातील व तालुक्यातील सर्व सेवेकऱ्यांनी व भाविक भक्तांनी व रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे. मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण तज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन तसेच शिबीरमध्ये बी पी, शुगर, एसीजी, फेजिओथेरेपी मोफत तपासणी मान, पाठ, कंबर, गुडघे, सांधेदुखी, वात, कफ, पित्त, विकार तसेच तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाने हृदयविकार, सर्व प्रकारचे कॅन्सर, मुतखडा, त्वचा विकार, वात विकार, पोटाचे विकार, महिलांचे विकार, मुळव्याध, कावीळ, लहान मुलाचे विकार, मनोविकार इत्यादी विकाराचे रोगनिदान केले जाईल.
सदरील मोफत आरोग्य तपासणी शिबीर दि. १२ ऑगस्ट २०२३ शनिवार रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र ( दिंडोरी प्रणित ) कै लक्ष्मणराव बिडवई नगर लोहा येथे होणार आहे. तरी गरजूनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.