
चार तासाच्या आत पोलिसांनी पकडले..!
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी उमापूर कृष्णा जाधव
गेवराई/चकलांबा,गेवराई शहरातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील नॅशनल हायवे क्रमांक 222 वर गाड्या लुटणाऱ्या लुटारूंना अवघ्या चार तासात मुद्देमालासह पकडण्याची कौतुकास्पद कामगिरी चकलांबा पोलीस ठाणे ने केली असून,पोलीस ठाणे प्रमुख नारायण एकशिंगे व यांच्या टीम वरअभिनंदनचा वर्षाव होत आहे.
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फुलसांगवी यागावातून मार्केटिंग साठी जाणारा टेम्पो क्रमांक MH-20 EL-5570 तीन अग्यात व्यक्तीने अडवून त्यास पत्रकार व पोलीस,असल्याचे सांगूनटेम्पो चालकाकडून जबरदस्तीने 1800शे रुपयेकाढून घेतले होते.ही घटना 30 जुलै रोजी सायंकाळी 6:00 वाजता घडली होती.रात्री उशिरा ही घटना घडल्याने टेम्पो चालक विष्णू सुरवसे
राहणार सिल्लोडहा घाबरला असून
त्याने 31 जुलै रोजी चकलांबा पोलीस ठाण्यात अज्ञाततो तयार पोलीस पत्रकारावर गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक एकशिंगे यांनी तोतया पत्रकार व पोलीस, पथक स्थापन करून शोध मोहीम राबवण्यात आली.अवघ्या चार तासात तोतया पोलीस व पत्रकार,यांचा शोध घेऊन यांना ताब्यात घेतले.
त्यांना खाक्या दाखवल्या असता
त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली,यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेली होंडा शाइन मोटरसायकल
जबरदस्तीने काढून घेतलेले 1800 शे रुपये असा एकूण 52000हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही उपविभागीय
नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रमुख
नारायण एकशिंगे हवालदार इंगळे,
बारगजे पोलीस हेड कॉन्स्टेबल,
मिसाळ, घोडके, आदींनी केली आहे.
घटनेतील तोतया पत्रकार व पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्याला तत्काळ अटक केल्यामुळे व त्यांच्याकडील मुद्देमाल
जप्त केल्यामुळे परिसरात पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे वपथकातील इतर कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे…